अखेर आरोग्य विभागास आली जाग !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  केडगाव उपनगरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने या भागात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून नुकतीच पाहणी करून याबाबत आयुक्तांना अहवाल सादर करण्यात केला.

दिवसेंदिवस उपनगरांत कोरोचा प्रादुर्भाव वाढत आहे. केडगाव येथे रविवारी नव्याने रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे केडगाव येथील रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे.

या भागात महापालिकेकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोरोनारुग्ण आढळून आलेल्या भागात विरळ लोकवस्ती आहे. नव्याने दोन रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या अभियंत्यांकडून रविवारी पाहणी करण्यात आली.

तसेच आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. रुग्णांची संख्या असलेला परिसर सील करून कटेन्मेन्ट म्हणून जाहीर केला जातो.

Finally wake up to the health department!
हा क्षेत्रफळाने मोठा असला लोकवस्ती विरळ आहे. त्यामुळे सोमवारी केडगाव, शाहुनगर सील करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment