अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार २२८ झाली आहे. आज ११६५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
राज्यात आज ३३० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३८०० रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २७ हजार ८०४ नमुन्यांपैकी २ लाख ०६ हजार ४८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत
तर २० हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४१ हजार २९० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ९७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ४८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ७७९ झाली आहे. मालेगाव शहरातील ८ मृत्यू हे २५ एप्रिल ते ८ मे २०२० या कालावधीतील आहेत.
आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुण्यातील ९, मालेगाव शहरात ८, पुणे जिल्ह्यात १, अकोला शहरात १, नांदेड शहरात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर २७ महिला आहेत. आज झालेल्या ४८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर १८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.
तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत ९ जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३९ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये (७२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: १२,८६४ (४८९)
ठाणे: ११० (२)
ठाणे मनपा: ८०० (८)
नवी मुंबई मनपा: ७८९ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ३१६ (३)
उल्हासनगर मनपा: २०
भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा भाईंदर मनपा: २०१ (२)
पालघर: ३२ (२)
वसई विरार मनपा: २१६ (९)
रायगड: ८९ (१)
पनवेल मनपा: १३७ (२)
ठाणे मंडळ एकूण: १५,५९५ (५२४)
नाशिक: ५०
नाशिक मनपा: ७३
मालेगाव मनपा: ४७२ (२०)
अहमदनगर: ५१ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: ४२ (१)
जळगाव: १११ (१२)
जळगाव मनपा: २२ (२)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण: ८५७ (४०)
पुणे: ११८ (५)
पुणे मनपा: १९७५(१४१)
पिंपरी चिंचवड मनपा: १३२ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: १८४ (१०)
सातारा: ९८ (२)
पुणे मंडळ एकूण: २५१३ (१६१)
कोल्हापूर: १३ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
सिंधुदुर्ग: ५
रत्नागिरी: १८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ७७ (३)
औरंगाबाद:५
औरंगाबाद मनपा: ४३७ (१२)
जालना: १२
हिंगोली: ५८
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ५१४ (१३)
लातूर: २५ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: ३० (३)
लातूर मंडळ एकूण: ६२ (४)
अकोला: ९ (१)
अकोला मनपा: १३४ (१०)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ७८ (११)
यवतमाळ: ९५
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ३४५ (२४)
नागपूर: २
नागपूर मनपा: २२२ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: २३० (२)
इतर राज्ये: ३५ (८)
एकूण: २० हजार २२८ (७७९)
(टीप – आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १७८ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. आज पालघर जिल्ह्यातील बाधित रुग्णांना त्यांच्या मूळ पत्त्यानुसार वसई विरार आणि मीरा भाईंदर मनपामध्ये दर्शविण्यात आले आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आयसीएमआर टेस्ट आय डी १५३०५७६ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांची आकडेवारी डेटा क्लिनिंगनुसार आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२४३ कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार ३८८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®