वॉशिंग्टन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासा व बूम सुपरसोनिक कंपनी विमान प्रवाशांचे एक मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लवकरच सुमारे ६ हजार किलोमीटरचे अंतर अवघ्या ३ ते ४ तासांमध्ये पूर्ण केले जाईल.
नासाने एका सुपरसोनिक विमानाची निर्मिती केली असून ते ते ताशी ९४० किलोमीटरच्या वेगाने उड्डाण करू शकते. थोडक्यात सांगायचे तर लंडन ते न्यूयॉर्कदरम्यानचे अंतर फक्त चार तासांत कापले जाईल.
एवढे अंतर कापण्यासाठी सध्या आठ तासांचा वेळ लागतो. नासाने तयार केलेल्या या विमानाला क्वाइट असे नाव देण्यात आहे.
४० आसनांच्या या विमानातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ५,७७४ डॉलर म्हणजे सुमारे ४ लाख रुपये मोजावे लागतील. कॉनकॉर्डमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एवढ्या अंतरासाठी सुमारे ९.२३ लाख रुपये मोजावे लागत होते.
या हिशेबाने नासाच्या या नव्या विमानातून हे अंतर कितीतरी स्वस्त दरामध्ये पार केले जाऊ शकेल. कॉनकॉर्ड विमानाची सुरुवात ४ मार्च १९६९ला झाली होती.
त्याची निर्मिती एअयोस्पेशियल व ब्रिटिश कंपनी बीएसीने केली होती. या विमानाने २६ नोव्हेंबर २००३ला शेवटचे उड्डाण घेतले होते. आपल्या कार्यकाळात केवळ एकदाच ते अपघातग्रस्त झाले होते.
२५ जुलै २००० रोजी फ्रान्सहून न्यूयॉर्कला जाताना त्याला अपघात झाला होता. त्यात ११३ लोकांचा मृत्यू झाला होता. नासाच्या नव्या विमानाचा सुपरसोनिक वेग ही त्याची सगळ्यात मोठी खासियत होती. त्यामुळे ते लंडन ते न्यूयॉर्कदरम्यानचे अंतर चार तासांत पूर्ण करेल.
Entertainment News Updates
- सैराटमध्यल्या आर्चीचा हा लुक तुम्ही पाहिलाय का ?
- सनी लियोनीने फेसबुकवर केलीय ही कामगिरी !
- मराठी अभिनेत्रीचे साडीतले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल !
- एकेकाळी न्यूड एमएमसमुळे चर्चेत आली होती ही अभिनेत्री पहा तिचा बोल्ड अवतार