१. इंडियन 2 :
शंकर यांचा पुढचा चित्रपट ज्यांनी रोबोट आणि 2.0 सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. इंडियन 2 या चित्रपटाचे शूटिंग जोरात चालू आहे. या चित्रपटामध्ये कमल हसन, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, विद्युत जामवाल आणि सिद्धार्थ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे बजेट 200 करोड पेक्षा अधिक आहे आणि हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
2. लालसिंग चड्डा :
हा चित्रपट आमिर खान आपल्या होम प्रॉडक्शनमध्ये बनवत असून हा चित्रपट एका हॉलीवुड चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाची शूटिंग तब्बल 100 पेक्षा अधिक ठिकाणी झाली आहे. या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत आहे.
3. राधे :
सलमान खानने या चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटाची सिनेवर्तुळात खूप चर्चा चालू आहे. सलमान खानने या चित्रपटाची शूटिंग सुरू केली असून हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. चित्रपट राधे मध्ये जबरदस्त ॲक्शन बघण्यास मिळणार आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात सलमान सोबत दिशापाटनी सुद्धा दिसणार आहे. चित्रपटाचे काही पोस्टर रिलीज झाले असून सोशल मीडियावर त्यांची तुफान चर्चा चालू आहे.
4. सनकी:
शाहरुख खान स्टारर या चित्रपटाची अद्याप घोषणा झालेली नसली तरीही लवकरच या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरूख खान जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार असून या चित्रपटातील कॉमेडी ही धमाकेदार असणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होऊ शकतो.
5. आर आर आर :
बाहुबली सारखा ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक एस एस राजमौली आता परत एकदा बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घालण्यासाठी तयार आहेत. बाहुबली नंतर आता ते हा चित्रपट बनवत आहेत या चित्रपटाचं बजेट तब्बल 450 करोड रुपये इतक आहे. या चित्रपटात अजय देवगन आणि आलिया भट त्याचबरोबर रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात देखील बाहुबली सारखे जबरदस्त ॲक्शन पाहण्यास मिळणार आहे.