इंडिकाची धडक बसून पाच वर्षांच्या मुलाच मृत्यू 

Published on -

अहमदनगर – जामखेड तालुक्यातील साकत येथील कोमल व गोविंद चव्हाण हे रक्षाबंधनासाठी सारणी (ता. केज) येथे गेले असताना त्यांच्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा इंडिका कारची धडक बसून जागीच मृत्यू झाला.

अथर्व गाेविंद चव्हाण असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कोमल व तिचे पती अथर्वसह नांदूर फाट्यावरून टमटमने सारणी फाट्यावर उतरले. त्याचवेळी केजकडून येणाऱ्या इंडिकाची रस्त्याच्या कडेला असलेल्या अथर्वला धडक बसली.

त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर कारचालकाने गाडी तेथेच सोडून पळ काढला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe