अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- राज्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे शिवाजीराव देसाई यांनी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी शनिवारी सांत्वनपर भेट घेतली.
माजीमंत्री प्रा. शिंदे यांचे वडील शंकरराव शिंदे यांचे गत पंधरवाड्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी चौंडी येथे माजी मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी दुपारी अडीचच्या सुमारास भेट दिली.
सुमारे पंधरा ते वीस मिनिटे प्रा. शिंदे यांच्याशी गृहराज्यमंत्री देसाई यांनी संवाद साधला. प्रा. शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांचीही मंत्री देसाई यांनी भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
यावेळी पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, शिवसेना तालुका प्रमुख संजय काशिद, मंगेश चिवटे, जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, पणन संचालक पांडुरंग उबाळे,
सरपंच डॉ. बाळासाहेब बोराटे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, सरपंच लहू शिंदे, उध्दव हुलगुंडे, डीवायएसपी संजय सातव, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.
-
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा