अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतची आगामी निवडणुकीची रणधुमाळी अद्याप सुरू झालेली नसताना भाजपाचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी मात्र आपला प्रभाग दोनचा उमेदवार जाहीर करून बाजी मारली आहे.
कर्जत नगरपंचायत मधील नगरसेविका नीता अजिनाथ कचरे यांच्या प्रभाग क्रमांक दोन मधील सभामंडपाचे लोकार्पण संपन्न झाले.
यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, या प्रभागात नगरसेविका अनिता कचरे यांनी माझ्याकडून अनेक विकास कामांसाठी निधीची मागणी करून अनेक विकास कामे केली आहेत.
यात प्रामुख्याने अंतर्गत डांबरी रस्ते, गटारी, कॉंक्रीट रस्ते, सभामंडप तसेच स्ट्रीट लाईटचे कामे व कर्जतवरून फिल्टर पाण्याची सोय सुद्धा या प्रभागातील नागरिकांसाठी नगरसेविका नीता कचरे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहेत.
त्यामुळे आगामी नगर पंचायत निवडणुकीत या प्रभागाच्या उमेदवार निता कचरे याच असतील असे प्रा .राम शिंदे यांनी जाहीर सभेत सांगत निता कचरे यांची उमेदवारीच थेट जाहीर केली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved