अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- येत्या गुरुवारपर्यंत नगरसह राज्यात सगळीकडेच पावसाची संततधार पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे.
सततच्या या पावसाने मात्र नगरकरांना पहाटे व भल्या सकाळी धुके अनुभवता येत आहे. रविवारी सकाळी नागरिकांनी धुक्याचा आनंद घेतला.
गुजरात व मध्य प्रदेशातून माघार घेतलेल्या परतीच्या पावसासाठी राज्यातूनही माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील काही दिवसांत ही स्थिती तयार होण्याची शक्यता आहे.
पुढील आठवडाभर राज्यात पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अंदमान समुद्राच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र येत्या बुधवारी तयार होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असून अनेक ठिकाणी पाऊस पडेल. राज्यात होत असलेल्या तुरळक ठिकाणच्या पावसामुळे काही ठिकाणी धुके पडत आहे. पहाटे हवेत काहीसा गारवा तयार होत असल्याने किमान तापमानात चढउतार होत आहे, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved