बाॅयलर आवाजाच्या त्रासातून नागरिकांना मुक्त करा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  मागील महिन्यापासूनच अगस्ती साखर कारखान्याच्या बॉयलरच्या आवाजाचा त्रास अगस्तीनगर, शिवनदी, पानसरवाडी, भागडा, परखतपूर, कारखानरोड व अकोल्यातील रहिवाशांना होत आहे.

नागरिकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत आहे. हे ध्वनिप्रदूषण थांबवून नागरिकांना त्रासातून मुक्त करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष संदीप शेणकर यांनी केली आहे.

कारखाना व्यवस्थापनाने याची गंभीर दखल न घेतल्यास शुक्रवारी (१८ डिसेंबर) कार्यकारी संचालकांच्या दालनासमोर “ढोल बजाव व प्रदूषण बढाव’

आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. याबाबतचे निवेदन तहसीलदार, नगरपंचायतचे मुख्याधिकारी व पोलिसांना देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment