अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीस सापळा रचून अटक

Published on -

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- नेवासा तालुक्यातील माका येथील तरुणीवरील अत्याचार प्रकरणातील पसार आरोपीला सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सापळा रचून अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माका येथील तरुणीशी प्रेमसंबंध संबंध वाढवून तिच्यासोबत तिचे इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला.

याबाबत तरुणीने फिर्याद दिल्यावरून सोनई पोलीस ठाण्यात आरोपी शरद नवनाथ वाघमोडे रा.पाचुंदा, ता.नेवासा याच्या विरुद्ध भादंवि कलम ३७६ (२) (एन) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. मात्र आरोपी पसार झाला होता.

सहाय्यक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली की यातील आरोपी हा त्याच्या नातेवाईकाकडे आलेला आहे. त्यानुसार त्यांनी याबाबत काल रात्री पोलीस पथकासह सापळा रचून रात्री आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe