अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : कानपूरमध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा आरोप असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर मध्ये ठार झाला आहे.
विकास दुबेला आज सकाळी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स कानपूरला नेत होती. यावेळी एसटीएफच्या ताफ्यात स्कॉर्पिओ, सफारी आणि महिंद्र अशी तीन वाहने होती. यापैकी एक गाडी रस्त्यात उलटली.
गॅंगस्टर विकास दुबे यांच्यासह कानपूरकडे जाणारी एसटीएफच्या ताफ्यातील गाडी शुक्रवारी सकाळी अपघात झाला. असं सांगितलं जात आहे की, गाडी पलटली अपघातानंतर विकास दुबेने पोलिस पथकाकडून पिस्तूल हिसकावून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या छातीत गोळी लागली होती. नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
कानपूरच्या चौबेपुर भागातील बिक्रू गावात गेल्या आठवड्यात झालेल्या चकमकीचा मुख्य आरोपी गुंड आहे. विकास दुबे याला गुरुवारी उज्जैनमधील महाकाळ मंदिरातून अटक करण्यात आली होती
कानपूरच्या बिकरू गावात गँगस्टर विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर झालेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह 8 पोलीस ठार झाले होते.
या घटनेपासून यूपी पोलीस आणि एसटीएफची टीम विकास दुबेचा शोध घेत होते. यासंदर्भात पोलिसांनी बुधवारी सकाळी दिल्लीजवळील फरीदाबादमध्ये छापा टाकला.
विकास दुबे इथं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, पोलीस येण्यापूर्वीच तो तिथून पळून गेला. या छाप्यात फरीदाबाद पोलिसांनी विकास दुबेच्या तीन साथीदारांना अटक केली होती.पोलिसांनी आतापर्यंत विकास दुबे टोळीशी संबंधित पाच गुन्हेगारांना ठार मारले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews