अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- अत्यंत वर्दळीच्या लोकवस्तीजवळ एका चायनीय हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट झाला. यावेळी पत्राच्या छताचे व या ठिकाणच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. दरम्यान हि घटना शिर्डी येथील श्रीरामनगर भागात घडली होती.
दरम्यान आगीवर वेळीच नियंत्रण मिळवतानाच पाच पैकी चार गॅस टाक्या सुरक्षित काढण्यात यश आले. यामुळे मोठी जीवीत हानी टळली. याबाबत अधिक माहिती अशी कि, २६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
येथील श्रीरामनगर भागात कोते गल्लीजवळ कोलकाता येथील गौर मंडल व चुलता सुखदेव मंडल हे चायनिजचा कच्चा माल तयार करतात. कच्चा माल तयार करण्याचे काम चालू होते.
अचानक गॅस शेगडी व सिलेंडरने पेट घेतला. क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले. गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोट झालेल्या गॅस टाकीच्या ठिक-या ठिक-या झाल्या.
गॅस टाकीच्या स्फोटाचा आवाज घेऊन जवळ राहणा-या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तातडीने अग्नीशामक दलाची संपर्क साधला.
दरम्यान तात्काळ होतेमधील उर्वरित चार गँस टाक्या काढण्यात आल्या. काही क्षणात शिर्डी नगरपंचायतीचा अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाला व आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण समजू शकले नाही.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved