संगमनेर :- तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील १९ वर्षांच्या तरुणीने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋतुजा नंदू पावसे असे या तरुणीचे नाव आहे.
तिने आपल्या राहत्या घरात सकाळी आठच्या सुमारास कोणी नसताना साडीने गळफास घेतला.पोलिस पाटील मथाजी पावसे यांनी या घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली.

File Photo
पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शेख आणि तोडकरी यांनी पंचनामा केला.