अविनाश आदिक यांना विधान परिषदेवर संधी द्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांना राष्ट्रवादीच्या कोठ्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी देण्यात यावी अशी मागणी राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांनी केली आहे.

श्री.पवार म्हणाले की, माजी मंत्री तथा साखर कामगारांचे नेते स्वर्गीय गोविंदराव आदिक यांचे साखर कामगार संघटनेच्या माध्यमातून राज्यातील साखर कामगारांचे प्रश्न सोडवण्यात मोठे योगदान होते.

शासन व कारखानदार यांचे मध्ये कधी सांमजश्याची तर कधी आंदोलनाची भूमिका घेत साखर कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून दिले.एक कार्यतत्पर नेता म्हणून स्वर्गीय गोविंदराव आदिक यांची राज्याला व देशाला ओळख होती.

त्यांचे निधनानंतर साखर कामगार संघटनेच्या जबाबदारीची धुरा त्यांचे चिरंजीव अविनाश आदिक यांच्या खांद्यावर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर फेडरेशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून अविनाश आदिक यांची कामगिरी ही उत्तम आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खंदे समर्थक असलेले अविनाश अधिक सध्या साखर कामगार चळवळ(सहकार),शैक्षणिक व राजकीय या तीनही क्षेत्रात कार्यरत असून या क्षेत्रातील त्यांची कामगिरी सुद्धा उत्तम आहे.

महाराष्ट्र राज्यात सुमारे 200 साखर कारखान्या मध्ये जवळ पास 2 लाखए साखर कामगार काम करत आहेत.महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशन या कामगारांचे प्रतिनिधित्व करत आहे.

अविनाश आदिक यांनी राज्य साखर कामगार फेडरेशनच्या अध्यक्षपदाची धुरा संभाळल्या पासून साखर कामगारांच्या प्रश्नांचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला.

राज्यातील साखर कामगारांचे वेतन वाढीचा कराराची मुदत 31 मार्च 2014 रोजी संपलेली होती.कामगार संघटनांनी 40 टक्के वेतनवाढ मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेल्या नंतर जुलै 2015 मध्ये राज्य शासनाने साखर कारखाना प्रतिनिधी,

साखर कामगार प्रतिनिधी व शासनाचे प्रतिनिधी असलेली त्रिपक्ष समीती गठीत केली.या समितीच्या अनेक बैठका होऊनही वेतन वाढीचा तिढा सुटू न शकल्याने महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशनने 28 डिसेंबर 2015 रोजी मोर्चा काढून पुणे साखर आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

त्याच दिवशी मुंबई येथे त्रिपक्ष समितीची मिटिंग होऊन वेतनवाढीचा अंतिम निर्णय होईपर्यंत 1 जानेवारी 2016 पासून 900 रुपये अंतरींम वाढ लागू करण्याचा निर्णय झाला.

नंतर साखर कामगारांना 15 टक्के वेतनवाढ मिळाली,त्याचा सुमारे 2 लाख साखर कामगारांना फायदा झाला. यावेळी सुद्धा 31 मार्च 2019 रोजी त्रिपक्ष समितीची मुदत संपल्याने नवीन समिती तातडीने गठीत होऊन साखर कामगारांना वेतनवाढ मिळावी यासाठी अविनाश आदिक यांचे नेतृत्वाखाली साखर कामगार फेडरेशनने शरद पवार यांना साकडे घातलेले आहे

त्याचबरोबर मुख्यमंत्री, सहकार मंत्री,कामगार मंत्री,साखर आयुक्त,कामगार आयुक्त यांचे कडे सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे.

साखर कामगारांच्या कल्याणासाठी सातत्याने झटणाऱ्या अविनाश आदिक या साखर कामगार नेत्याची राष्ट्रवादी च्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करावी अशी राज्यातील साखर कामगारांची मागणी असल्याचे ही श्री.नितीन पवार यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment