ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ‘भारतरत्न’ द्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केंद्र सरकारने भारतरत्न किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी वडनेर येथील स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य गणेश शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेली साठ वर्षे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे देशातील जनतेसाठी मोठे योगदान आहे. माहिती अधिकाराचा कायदा केवळ त्यांच्यामुळे संमत झाला आहे.

देशातील भ्रष्टाचाराची कीड कायमची नाहीशी होण्यासाठी त्यांनी गेली साठ वर्षांत अनेक आंदोलने केली. दिल्ली व मुंबई आंदोलनाचीच काय

परंतु अनेक आंदोलनाची दखल घेत लोकाभिमुख कायद्यामध्ये सरकारने बदल करत अण्णांच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळाला आहे.

स्वातंत्र्यानंतर जी लोकाभिमुख आंदोलने झाली व लोकांना मुक्त स्वातंत्र्यासाठी ज्या कायद्यांची आवश्यकता होती ती मिळवून देण्यासाठी

ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांना भारतरत्न हा किताब हजारे यांना द्यावा, ही भारतीयांची इच्छा आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment