महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे गंठण लांबविले

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर : शहरातील अकोले बायपास रस्त्यावरील पेटीट हायस्कूल येथून जाणाऱ्या जयश्री पंढरीनाथ सहाणे (वय ३०, रा. गोविंदनगर, गल्ली क्र. ५, संगमनेर) या महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे गंठण चोरून अज्ञात चोरट्यांनी धूमस्टाईलने पोबारा केल्याची घटना शुक्रवार दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एक ते दीड वाजेच्या सुमारास घडली आहे.

त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयश्री पंढरीनाथ सहाणे ही महिला शुक्रवारी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास अकोले बायपास रस्त्याने पायी जात असताना ही महिला पेटीट हायस्कूल समोरील चौकात आली असता त्याचवेळी दोघे अज्ञात चोरटे मोटारसायकलवरून त्या महिलेच्या जवळ येवून त्यांनी महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे गंठण ओरबडून धूमस्टाईलने पोबारा केला आहे.

यावेळी महिलेने आरडाओरडही केली, पण तोपर्यंत चोरटे खूप लांब निघून गेले होते. याप्रकरणी जयश्री सहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ५३८/२०१९ भा. दं. वि. कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment