अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : जगभरात एड्स या आजाराने अनेक लोक दगावले आहेत. अद्याप एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे या आजाराविषयी खूप भीती आहे. परंतु आता एड्स रोगावर उपचार करणारे औषध मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलोच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ब्राझीलचा एका एचआयव्ही (HIV) पॉझिटिव्ह व्यक्तीला औषधांचे मिश्रण देण्यात आले.
या मिश्रणामुळं एड्सपासून ही व्यक्ती मुक्त झाली आहे. लवकरच जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) याबाबत माहिती देण्यात येईल असे विद्यापीठानं म्हटलं आहे.
संशोधक डॉ. रिकार्डो डियाज यांनी सांगितले की, हा ब्राझिलियन माणूस ऑक्टोबर 2012 मध्ये HIV पॉझिटिव्ह आढळला होता. रुग्णानं एड्सच्या उपचार दरम्यान देण्यात आलेली औषधं घेणं बंद केलं होतं.
संशोधनादरम्यान, रुग्णाला दोन महिन्यांनी अँटीरेट्रोव्हायरल औषधं आणि निकोटिनामाइड औषधांचे मिश्रण दिले. एक वर्षानंतर, जेव्हा रुग्णाची रक्त तपासणी केली गेली, तेव्हा त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.
दरम्यान, कॅलिफोर्निया विद्यापीठातील एड्स विशेषज्ञ डॉ. मोनिका गांधी यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व प्राथमिक स्तरावर आहे. कारण केवळ एक व्यक्ती बरा झाला आहे. याबद्दल आता अधिक संशोधन करण्याची गरज आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews