अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- सरकारी बँकांने आपले कर्जावरील व्याजदरात कपात केली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. आता देशातील मोठ्या खाजगी बँकेने ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
एचडीएफसी बँकेने कर्जावरील दरामध्ये 0.10 टक्क्याने कपात केली आहे. नवीन दर शुक्रवार अर्थात 07 ऑगस्टपासून लागू झाले आहेत.
या निर्णयामुळे ग्राहकांचे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील ईएमआय 0.10 टक्क्यांनी कमी होईल.
गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने व्याज दरात बदल न करण्याचा निर्णय घेतला.
आरबीआयने व्याजदरामध्ये कोणतेही बदल केले नाहीत. रेपो दर 4% वर कायम आहे. एमपीसीने हा निर्णय एकमताने घेतला आहे. रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के राहील. एमसीएफ, बँक दर 4.25% वर कायम आहेत.
याआधी मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी यूनियन बँक ऑफ इंडियाने व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला होता. UBI ने पगारधारक वर्गासाठी गृहकर्जावरील दर कमी करून 6.7 टक्के केले आहेत.
यूनियन बँकेने दिलेल्या माहितीनुसार, पगारधारक लोकांना 30 लाख रुपयापर्यंत गृह कर्जावर केवळ 6.7 टक्के व्याज द्यावे लागेल. बँक ऑफ बडोदामधेही 30 लाख रुपयांच्या कर्जावर 6.85 टक्के व्याज आहे. त्याचबरोबर,
अॅक्सिस बँकेच्या गृह कर्जाचा व्याज दर 7.70 टक्के आहे. हे दर एमसीएलआरवर आधारित आहेत. तर बेस रेट आधारित होम लोन 8.80 टक्के आहे. त्याचप्रमाणे आयसीआयसीआय बँकेच्या गृह कर्जाचे दर 6.95 टक्के आहेत.
हा दर 35 लाखांच्या गृह कर्जावर आकारला जात आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved