अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात काल एकाच दिवसात नऊ रूग्ण सापडले होते त्यामुळे अनेकांच्या टेन्शनमध्ये भर पडली
मात्र, आजचा दिवस नगर करांसाठी चांगला ठरला आज सकाळी नऊजणांचे रिपोर्ट आले. ते सर्व निगेटीव्ह आहेत.
त्यामुळे थोडेसे अहमदनगर जिल्ह्यात आज दिलासादायक वातावरण आहे.
दरम्यान जिल्ह्यातील दुसर्य़ा कोरोना रूग्णाचा चौदा दिवसांनंतरचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
आज पुन्हा त्याचा स्त्राव घेऊन नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तो रिपोर्ट निगेटीव्ह आला तर त्याला घरी सोडले जाणार आहे.
काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील पहिल्या रूग्णाला घरी सोडले आहे. तो होम क्वॉरंटाइन आहे.
त्याच्या पाठोपाठ दुसरा रूग्णही डिस्चार्जच्या उंबरठ्यावर आहे. तिसरा रुग्णाची प्रकृतीही ठणठणीत आहे.
सर्व कोरोनाबाधित रूग्ण परदेशातून आलेले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाच आतापर्यंत कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com