अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज : ‘या’ भागातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील आणखी नऊ जणांचे अहवाल सोमवारी निगेटिव्ह आले. रविवारी ३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला होता.

अजून ११ अहवालांची प्रतीक्षा आहे. जामखेड, नेवासे, संगमनेर आणि पाथर्डी तालुक्यातील रुग्ण सध्या उपचार घेत असून उर्वरित तालुके कोरोनामुक्त आहेत.

गेल्या आठवड्यात शनिवार वगळता एकही रुग्ण आढळून आला नाही. शनिवारी पाथर्डी तालुक्यातील मोहज देवडे गावातील एकाला बाधा झाली होती.

त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या लाळेचे नमुने प्रशासनाने तपासणीसाठी पाठवले होते. २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सोमवारी आणखी नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

मोहज देवडे येथील पाठवण्यात आलेले ४ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. चारपैकी तिघांचे लाळेचे नमुने पुन्हा पाठवण्यात आले आहेत.

नगर शहर व तालुक्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त

नगर शहरातील मुकुंदनगर, सर्जेपुरा व आलमगीर येथे अकरा रुग्ण आढळून आले होते. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश होता. ते सर्व रोगमुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment