सिनेरसिकांसाठी खुशखबर! या दिवसापासून उघडणार थिएटर्स

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता सरकारने देशातील सर्व सिनामगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र सिनेरसिकांसाठी खुशखबर असून लॉकडाऊनच्या घोषणेपासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत.

केंद्र सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे एसओपी जारी केली आहे. त्यानुसार, चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती लावता येणार आहे.

सिनेमा, थिएटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

यापूर्वी सिनेमा हॉल उघडण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी 50 टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.

01 जुलैपासून अनलॉक -2 सुरु झाला आहे. आता अनलॉक-5 येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहे आणि सिनेमा हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment