भक्तांसाठी खुशखबर! या धार्मिकस्थळी ऑनलाईन दर्शन सुविधा सुरु

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात गेली अनेक महिने धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. दिवाळीच्या पार्शवभूमीवर सरकारने मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली.

त्यानंतर अनेक मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा देखील सुरु केली. आता याच अनुषंगाने एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेले अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराजांचे ऑनलाईन दर्शनाची सुविधा भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

भक्त निवास, रुग्णालय, बगीचा,मंगल कार्यालय आणि मढी ते मायंबा रोपवे अशा विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कानिफनाथ देवस्थान विश्वस्त मंडळ काम करणार असल्याचे प्रतिपादन देवस्थानचे नूतन अध्यक्ष संजय मरकड यांनी केले आहे.

मढी येथील कानिफनाथ देवस्थान मढी गडावर सुरू केलेल्या हिरकणी कक्षाची उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष संजय मरकड बोलत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News