अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- आपल्या राज्यात नेहमीच शेतीला लागणाऱ्या विजेचा कायमच पुरवठा कमीच असतो. सरकारने मोफत वीज दिली नाही तरी चालेल, मात्र दिवसात पूर्ण क्षमतेने कमीत कमी 16 तास अंखडीत वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असत. याच अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतून नाशिक परिमंडळात विविध ठिकाणी साकारलेल्या एकूण ६० मेगावॅटच्या सौरप्रकल्पातून एकूण २८ कृषी विद्युत वाहिन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना आता दिवसा वीज मिळण्यास सुरुवात झाली आहे.

ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी राज्यातील सौर ऊर्जेवर सुरु करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार कार्यान्वित करण्यात आलेल्या राज्यातील ५० कृषिवाहिन्यांमध्ये नाशिक परिमंडलातील २८ तथा अहमदनगर मंडळातील ४ कृषी वाहिन्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत शेतीला दिवसा आठ व रात्री दहा तास असा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा केला जातो. रात्री अपरात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने शेतीला दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ ही योजना हाती घेतली आहे.
यानुसार नाशिक जिल्ह्यात ५ ठिकाणी ५ मेगावॉटचे २ म्हणजे एकूण १० मेगावॉटचे तर अहमदनगर जिल्ह्यात १ ठिकाणी ५ मेगावॉटचे २ असे एकूण ६ प्रकल्प उभारण्यात आले असून असून त्याची स्थापित क्षमता ६० मेगावॅट इतकी आहे. या सौर प्रकल्पातून तयार झालेली
वीज महावितरणच्या नजीकच्या उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या कृषी वाहिन्यांना दिवसा मिळणार आहे. असे असणार विजेचे टाईमिंग यामध्ये दिवसा मिळणाऱ्या वीज वेळेचे तीन टप्पे आहेत, यामध्ये सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत, सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आणि सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेचा समावेश असेल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved