वृत्तसंस्था :- आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या घरातल्या नववधूला आता सरकार एक तोळा सोनं फुकट देणार आहे,
आसाम सरकारने बालविवाह रोखण्यासाठी आणि स्त्रीभृणहत्येला लगाम मिळावा यासाठी अरुंधती योजना नावाने ही खास सरकारी मदत सुरु केली, या योजनेअंतर्गत नववधूला चक्क एक तोळा सोनं सरकार देणार आहे.
खुद्द मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी या योजनेस मंजुरी दिली असून ही योजना राज्याच्या बजेटमध्येच समाविष्ट केलेली होती. ती आता प्रत्यक्षात येणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश बालविवाहांची संख्या कमी करणं असून 18 वर्षांखालील मुलींचे विवाह आसामात सर्रास होतात. त्यावर लगाम घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.