अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. यासाठी प्रत्येक गावकऱ्याने राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन गावचा विकास साधावा. निवडणुका संपल्या की पक्षीय मतभेद बाजूला ठेवावे.
डॉ.बबन डोंगरे यांच्यावर नवनागापूरमधील ग्रामस्थांनी विश्वास ठेवून सत्ता दिली. ते सत्तेच्या माध्यमातून गावच्या विकासाला चालना देतील. नवनागापूर भाग हा शहराच्या जवळील भाग असून नवनागापूर ग्रामपंचायतीमध्ये एमआयडीसीचा भाग येतो, यासाठी आम्ही सर्वजण एमआयडीसीच्या औद्योगिक विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून देवू.
डॉ.बबन डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकास होईल. राज्यामध्ये नवनागापूर ग्रामपंचायत ही विकासाचे मॉडेल होईल, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नवनागापूर ग्रामपंचायतीवर डॉ.बबन डोंगरे यांचा पॅनलने मोठा विजय मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना आ.जगताप समवेत स्वराज कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे, उद्योजक सुनिल काळे, बाळासाहेब बारस्कर, डॉ.अतुल खालकर, भा.कुरेशी आदी उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved