अहमदनगर : आपल्या आजोबाची वाट पाहत थांबलेल्या चंद्रकांत युवराज मजानवर यांना काही एक कारण नसताना पाच जणांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत.ही घटना दि.१४ डिसेंबर रोजी जामखेड तालुक्यातील वाकी लोणी फाटा येथे घडली.
या प्रकरणी चंद्रकांत मजानवर यांच्या फिर्यादीवरून आसाराम मुळशीराम सावंत (वय ४५, रा.वाकी),वैभव आसाराम सावंत (वय २५ रा.वाकी),अनिता आसाराम सावंत (रा.वाकी),वेणू अरूण काळे (रा.सारोळा),अरूण काळे (रा.सारोळा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी चंद्रकांत मजानवर हे त्यांच्या आजोबांची वाकी लोणी फाटा येथे वाट पाहत थांबले होते.परंतु काहीएक कारण नसताना देखील वरील पाच जणांनी फिर्यादीस दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तसेच डाव्या हाताच्या कोपऱ्याला चावा घेतला.यावेळी फिर्यादीच्या आजोबांनी भांडणात मध्यस्ती करून भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता वरील आरोपींनी त्यांनादेखील शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तसेच परत आमच्या नादी लागले तर एक एकाचा मुडदा पाडू अशी धमकी दिली.याबाबत अधिक तपास पोहेकॉ.भोस हे करत आहेत.