पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरूवार दि. 9 जुलै 2020 रोजी जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

सकाळी 6-30 वाजता मुंबई येथुन संगमनेरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता संगमनेर येथे जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा पोलीस अधिक्षक, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी,

प्रांताधिकारी, पोलीस उपअधिक्षक, संबंधित अधिकारी यांच्‍या समवेत प्रांताधिकारी कार्यालय, संगमनेर येथे कोरोना आढावा बैठक. दुपारी 12 वाजता संगमनेर येथुन अहमदनगरकडे प्रयाण.

दुपारी 2 वाजता जिल्‍हाधिकारी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी (जि.प.), जिल्‍हा पोलीस अधिक्षक, महानगरपालिका आयुक्‍त, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक,

जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍हा कृषी अधिकारी, जिल्‍हा उपनिबंधक, जिल्‍हा पुरवठा अधिकारी आणि व्‍यवस्‍थापक जिल्‍हा बँक यांच्‍या समवेत नियोजन समिती सभागृह,

जिल्‍हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक. दुपारी 3.30 वाजता मोटारीने अहमदनगर येथुन कागल, कोल्‍हापुरकडे प्रयाण.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News