जामखेडच्या ‘त्या’ कामांवर अखेर हातोडा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- दोन वर्षापासून रखडलेल्या खर्डा चौक ते लक्ष्मी चौकापर्यंत कामासाठी बांधकाम विभागाने रविवारी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर हातोडा टाकला.  आता सुसज्ज रस्ता व खर्डा चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

खर्डा चौक ते खर्डा असा वीस किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी सहा कोटी रुपये मंजूर होते, करमाळा चौक ते खर्डा पर्यंत रस्ताही झाला पण लक्ष्मी चौक ते खर्डा चौकापर्यंत सुमारे साडेपाचशे मीटर रस्त्याचे काम रखडले होते.

काही दिवसांपूर्वी गटाराचे काम झाले नंतर बरेच दिवस काम रखडले होते तेव्हा परत अतिक्रमण झाले होते. बांधकाम विभागाने चार महिन्यांपूर्वी अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावल्या होत्या पण अतिक्रमणे काढण्यात आली

नव्हती खर्डा चौकाचे सुशोभित करण्यासाठी व रस्ता प्रश्न मार्गी लागण्यासाठी बांधकाम विभागाने आज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविले खर्डा चौकात उपलब्ध जागेनुसार सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment