उसण्या पैशावरुन पती – पत्नीस बेदम मारहाण

Published on -

राहुरी – राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात खिळे वस्ती भागात राहणारे कासीम मैदबुद्दीन पठाण यांनी उसणे दिलेले ३२ हजार रुपये मागितले.

त्यावरून त्यांना व त्यांची पत्नी रुबिना पठाण यांना लाथाबुक्क्याने व लाकडी बॅटने बेदम मारहाण करून शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

कासीम मैनुद्दीन पठाण यांच्या फिर्यादीवरुन आरोपी बादशाह मैनुद्दीन पठाण, जावेद बादशाह पठाण, मालन बादशाह पठाण, रा. खिळेवस्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोना जायभाये हे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe