नगरकरांची धाकधूक वाढली; तब्बल अकरा जण इंगलंडहून नगरमध्ये दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यापासून कोरोनाचे संकट जगावर घोंगावत आहे. यातच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा जगावर संकट ओढवले आहे.

यातच नगरकरांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरात विविध ठिकाणी इंग्लंडहून ११ जण आल्याची माहिती समोर आली आहे.

पाच वेगवेगळ्या कुटुंबातील या व्यक्ती असून, त्यांची कोरोना चाचणी होणार आहे. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी या माहितीला दुजोरा दिला.

इंग्लडहून नगरला आलेल्यांमध्ये मार्केटयार्डमधील ०२, कराचीवालानगरमधील ०४, गुलमोहोर रोडवरील ०३, पाईपलाईनरोड व नवनागापूर येथील प्रत्येकी एक, अशा एकूण ११ जणांचा यात समावेश आहे.

नगरमधील हे प्रवासी ०७, ०९, १२, १४, २१ आणि २२ डिसेंबरला आली आहेत. महापालिकेतर्फे या ११ जणांची कोरोबाबत आरटीपीआर चाचणी होणार आहे.

या चाचणीमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एऩआयव्ही पुणे येथे पाविण्यात येणार आहे. या तपासणीतून इंग्लंडमधील नवीन विषाणू स्ट्रेनशी मिळताजुळता आहे का, याची तपासणी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment