अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरात तबलीग जमाआत संदर्भात ध्वनी द्वारे बदनामी करणार्या महापालिका अधिकारी व त्यांनी ज्यांच्या आदेशाने केले त्यांच्यावर कारवाई करावी. ज्याप्रकारे अहमदनगर महानगरपालिकेने ध्वनीचा वापर करून तबलीग जमाआत, मरकज, पिर हजरत निजामुद्दीन रह.
यांची बदनामी केली, त्याच प्रकारे त्याच ध्वनीद्वारे आणि वृत्तपत्रात जाहीर माफी मागावी, अशी मागणी एम.आय. एम. जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे. कोरोना काळात काही तबलिग जमाआतचे भारतीय व विदेशी नागरिक धर्म प्रसार करण्यासाठी धार्मिक स्थळात जात होते.
मार्च महिन्यात अचानक लॉकडाऊन लागले. अहमदनगर शहरातही धर्म प्रसार करण्यासाठी आले असताना लॉकडाऊनमुळे इथेच राहिले. अहमदनगर शहरात जेव्हा तबलिग जमतचे नागरिक सापडले तेव्हा ते इथे अडकले का लपून बसले याची शाहनिषा ना करता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले.
आणि काही मीडियाने दिल्ली मरकज ला टार्गेट केल्याने पूर्ण भारतात मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाकडे बघण्याचा दुष्टिकोन बदलला. अहमदनगर मध्य तबलीग जमाआत चे लोक सापडल्याने अहमदनगर महानगपालिकेने दिल्ली मरकज, तबलिग जमाआत, हजरत निजामुद्दीन रह.
यांच्या विरोधात ध्वनि क्षेप लाऊन पूर्ण महापालिका क्षेत्रात असे वातावरण निर्माण केले की जसे कोरोना या देशात तबलिग जमाआत मुळे आला, इतका विष पेरन्यात आले की मुस्लिम समाजाला बघतांना देशद्रोही या नजरेने बघत होते. हे सर्व अहमदनगर महापालिकेमुळे अहमदनगर शहरात झाले.
आत्ता उच्च न्यायालयाने जेव्हा निर्णय दिला की जमाआतला बळीचा बकरा केला आहे तर पूर्ण देशात स्वतःचे अपयश झाकण्यासाठी तबलिग जमाआतला सरकार कडून टार्गेट करण्यात आले आहे, असे समजते. यात अहमदनगर महानगर पालिकाही मागे राहिली नाही. यासर्व घटनेमुळे पूर्ण देशातील विशेषतः अहमदनगर शरातील मुस्लिम समाजाला मानसिक छळ सहन करावे लागले असे गंभीर आरोप निवेदनात केले आहे.
अहमदनगर महानगर पालिकेने जो ध्वनीक्षेप लाऊन तबलिग जमात व मुस्लिम समाजाची बदनामी केली त्याची माफी जाहीर रीतीने मागावी व ज्या ज्या अधिकारी या षड्यंत्रत शामील होते त्यांच्यावर देशात द्वेष पसरून वातावरण दूषित केल्यामुळे कठोर कारवाही करण्याची मागणी डॉ. परवेज अशरफी यांनी निवेदनद्वारे केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved