अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली.
गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्यूटला दिलेली ही दुसरी भेट आहे. दरम्यान अनेकांनी शरद पवारांवर कोरोनाची लस घेतल्याची चर्चा सुरू होती.

शरद पवार बिनधास्त फिरतात यावरुन त्यांनी लस घेतल्याची चर्चा रंगली होती. आज मीडियाशी बोलताना शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, मी कोरोनावरील लस घेतली असे लोक म्हणत आहेत, परंतु ते खरं नाही, केवळ अफवा आहेत.
सीरम इन्स्टिट्यूट कडे आत्ता रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे बीसीजी इंजेक्शन आहे. ते इंजेक्शन आज मी घेतले आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेदेखील हे इंजेक्शन घेतले आहे.
मात्र ही कोरोनाची लस नाही, तर रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील लस यायला जानेवारी उजाडेल, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, शरद पवारांनी या भेटीत सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीच्या कामाची प्रगती कुठपर्यंत पोहचलीय यांची माहिती घेतली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved