अहमदनगर :- एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात तापमानाने उसळी घेतल्याने पारा ४४ ते ४५ अंशांवर कायम आहे.
सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी नगरचे ४४.९ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत.

त्यामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडले आहेत. तापमानाचा पारा चढाच असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे घरातून बाहेर पडणेदेखील अनेकांना नकोसे झाले आहे.एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढली, तर मे मध्ये उन्हाच्या तीव्रता किती असेल, याची भीती नगरकरांनी घेतली आहे.
सायंकाळी सहा वाजेनंतरच नागरिक आपल्या कामासाठी बाहेर पडत आहेत. उद्यानातही सायंकाळी लहानग्यासंह ज्येष्ठांनी गर्दी केल्याचे चित्र सर्व उद्यानांत दिसून येत आहे.
रविवारी शहरात तापमानाने उच्चांक गाठला. रविवारी नगरचे तापमान ४५. अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सोमवारी तापमान ४४.९ अंश नोंदवले गेले. नगरमध्ये यापूर्वी एप्रिल २०१० मध्ये सर्वाधिक ४८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते.
- 20 हजार पेक्षाही कमी किंमतीत मिळतील हे 3 वॉटरप्रूफ 5G स्मार्टफोन्स
- फक्त 4 लाखात घरी आणा AMT व्हेरियंट Renault Kwid ची जबरदस्त ऑफर
- फक्त 8 एप्रिलपर्यंत ! Brezza वर सध्या मिळतोय भलामोठा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर
- घरबसल्या घ्या सिनेमॅटिक मज्जा, शाओमीचा 4K व्हिज्युअलचा TV लवकरच भारतात
- खुशखबर ! टाटा हॅरियरवर मिळतेय बंपर सूट, अशी संधी पुन्हा येणार नाही