धारवाडी चिचोंडी परिसरात पावसाने घरांचे आणि पिकांचे प्रचंड नुकसान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ मार्च रोजी वादळवाऱ्यांसह झालेल्या पावसाने घरांचे आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पत्र्यांची घरे अक्षरशः उन्मळून पडले ,जीवितहानी झाली नसली तरी संसार मात्र उघड्यावर आले आहेत.

संचारबंदी च्या काळात ही घटना घडल्याने करोनाच्या भीतीने घरात बसलेले शेतकरी निसर्गाच्या कोपाने हवालदिल झाले आहेत. सुरेश धोकरट यांचे घर वादळाने कोसळले आणि घरात माणसं आणि लहान मुलं अडकले होते. शेजाऱ्यांनी वेळीच मदत केल्याने जीवित हानी टळली.

धारवाडी गावातील गीते वस्ती येथील सचिन बाबासाहेब गीते, जालिंदर गीते, बाबासाहेब सोनावणे ,मनोज आव्हाड ,जनाबाई काळापहाड, नवनाथ रणसिंग, विनायक गोरे, महादेव रणसिंग, नारायण रनसिंग, नवनाथ रणसिंग, राहुल गंडाळ यांच्या घराची पत्रे उडून गेल्याने त्यांना छत्र राहिलं नाही.

पत्र्याची दुकानं बंद आहेत. किमान पत्रे आणि तत्सम सामान खरेदीसाठी दुकाने उघडे करून आम्हाला सामान द्या ,सरकारी मदत मिळेल तेंव्हा मिळेल अशी मागणी शेतकरी करत आहेत.छबु सोनवणे यांच्या घरावरील पत्रे उडून घरातील महिलेच्या डोक्यात दगड पडल्याने त्या जखमी झाल्या आहेत.

महसूल विभागाने पंचनामे केले असले तरी सरकारी मदत कधी मिळणार हा प्रश्नच आहे. पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, धारवाडी चे सरपंच बापू गोरे, उपसरपंच उध्दव काळापहाड आदींनी परिस्थितीची पाहणी करून कुटुंबियांना धीर दिला.तलाठी यांना तत्काळ पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment