अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : श्रीरामपूर तालुक्यात गोदाकाठ परिसरातील भामाठाण येथे बुधवारी ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. अवघ्या दीड तासातच गावातील ओढे, नाले दुथडी वाहू लागले.
पावसाच्या पाण्यामुळे गावातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने काही काळ परिसरातील सर्व सेवा बंद झाली, तसेच अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले.
गोदाकाठच्या कमालपूर ते मातुलठाणपर्यंतच्या भागात मृग नक्षत्राच्या बुधवारी झालेल्या पावसाने जोरदार मुसंडी मारली. भामाठाणसह परिसरातोल काही गावात तर या पावसाने शेतकऱ्यांनी केलेले पेरणी वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पावसामुळे गावातील गिरणा नाला ओसांडला तर जोरदार पावसाने अनेक वीजवाहक तारांचे खांब कोसळले, तारा तुटून पडल्या. खळवाडी व नवीन गावठाण परिसरातील रस्ते काही काळ बंद झाले होते.
शेतकऱ्यांच्या कांदा चाळीतही पाणी गेले. कमालपूर, घुमनदेव, माळवाडगाव, मुठेवाडगाव या परिसरात समाधानकारक पाऊस झाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews