अहमदनगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  अहमदनगर शहर व जिल्ह्यात आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

गुरुवारी रात्री ७.१५ वाजल्यापासून शहर व परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. तासभर पावसाचा जोर कायम होता.

गेल्या २५ दिवसांत जिल्ह्यात ३४ टक्के पाऊस झाला आहे. आगामी दोन दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री पुन्हा पावसाला सुरुवात झाली. नगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात गुरुवारी जोरदार पाऊस झाला.

नगर शहरातील सावेडी, पाईपलाईन रोड, भिंगार, नवनागापूर यासह शहराच्या मध्यवस्तीत देखील मुसळधार पाऊस झाला.आतापर्यंत नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे वगळता सर्वच तालुक्यात शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवस नगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment