अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : जामखेड शहरापासून अवघ्या दहा की मी अंतरावरील मात्र बीड जिल्ह्य़ातील मातावळी या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच मुंबई येथुन आलेला एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
या मयत व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला त्यामुळे मातावळी गावचा परीसर कन्टेनमेंट झोन घोषित केला आहे. त्यामुळे याची दखल घेऊन जामखेड प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाययोजना म्हणून तात्काळ मातावळीतुन जामखेड कडे येणारा रस्ता तातडीने जेसीबीच्या साह्याने खोदून बंद केला आहे.
जामखेड शहरापासून अवघ्या दहा किमी अंतरावरील मात्र बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील मातावळीत या ठीकाणी रविवार दि ८ रोजी एक रुग्ण मयत झाला होता.
याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला आसुन हा रुग्ण काही दिवसांपूर्वीच मुंबई येथुन मातावळीत आला होता. आष्टी तालुक्यातील मातावळी ही बीड जिल्ह्य़ात येत असली तरी मातावळी आष्टी तालुक्यातील आजुबाजुला आसलेल्या गावातील अनेक नागरिक जामखेड कोरोनमुक्त झाल्याने व येथील बाजारपेठ सुरु करण्यात आल्याने खरेदी अथवा इतर कामासाठी येत असतात.
त्यामुळे प्रशासनाने जेसीबी मशीनने खोदून बंद केला आहे. तसेच आष्टी वरूनही नगररोडनेही नागरिक मोठ्या प्रमाणावर नागरिक जामखेड शहरात येत आल्याने चेकपोस्ट कडक करण्याचे आदेश तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews