चिडगाव (सिमला) : २२ वर्षीय अंकिताला तपासणीनंतर एचआयव्ही पाॅझिटिव्ह घोषित करण्यात आले. ती गर्भवती होती. एचआयव्ही कसा झाला, असा प्रश्न होऊ लागला. ती कोमात गेली, नंतर मृत्यू झाला. नंतर समजले की, टायपिंगच्या चुकीमुळे तिला एचआयव्ही पाॅझिटिव्ह घोषित केलेे होते.
अंकिताचे वडील मियां राम यांनी सांगितले की, २१ ऑगस्टला रोहडूच्या संजीवनी रुग्णालयात सांगण्यात आले की, तिचे गर्भाशय फाटले आहे, सिमल्याला न्यावे लागेल. ती एचआयव्ही पाॅझिटिव्ह आहे.
मी त्याच दिवशी सिमल्याच्या कमला नेहरू रुग्णालयात तिला नेले. तिथे शस्त्रक्रिया झाली. पण पुन्हा चाचणी करण्याऐवजी डाॅक्टरांनी संजीवनी रुग्णालयाचा अहवालच खरा मानला. अखेर ती कोमात गेली.
तिला इंदिरा गांधी मेडिकल काॅलेजमध्ये हलवण्यात आले. २३ ऑगस्टला अंकिता, तिचा पती हरीश यांची चाचणी झाली. तेव्हा दोघेही नाॅर्मल होते, पण अहवालातील खोटेपणा कळण्याआधीच अंकिता कोमात गेली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.