अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- देशातील कोरोना महामारीचे संकट दूर होण्यासाठी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करुन नगर-कल्याण रोड येथील लोंढेनगरला होम-हवन करण्यात आले.
पै.संभाजी लोंढे याच्या प्रमुख उपस्थितीत होम-हवन कार्यक्रम पार पडला. शाम लोंढे, ज्योती लोंढे, दिनेश लोंढे, शीतल लोंढे, विजय दारकुंडे, मीरा दारकुंडे, अशोक काळे, मुक्तता काळे हे दांम्पत्य पुजेसाठी बसले होते.
कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व चिंतेत असून, याचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले असून, या महामारीशी सर्व झुंज देत आहे.
हे कोरोनाचे संकट दूर व्हावे ही विघ्न हर्ता श्री गणेश चरणी प्रार्थना करण्यात आली असल्याचे पै.संभाजी लोंढे यांनी सांगितले.
देशातील कोरोना महामारीचे संकट दूर होण्यासाठी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करुन नगर-कल्याण रोड येथील लोंढेनगरला होम-हवन करताना पै.संभाजी लोंढे समवेत शाम लोंढे, ज्योती लोंढे, दिनेश लोंढे, शीतल लोंढे, विजय दारकुंडे, मीरा दारकुंडे, अशोक काळे, मुक्तता काळे आदी.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved