अहमदनगर Live24 :- शिर्डीत नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या हॉटेल वत्सलास भर दुपारी अचानक आग लागल्याने सात लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
लॉकडाऊन असल्याने हॉटेल बंद असल्याने यात कोणी जखमी झाले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, १७ मार्चपासून साईमंदिर बंद झाल्याने लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व हॉटेल बंद आहेत.
हॉटेल वत्सला बंद असले तरी या ठिकाणी दररोज नित्यनियमाने पूजा केली जात होती. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पुजा करताना देव्हाऱ्यातील असलेला दिव्याचा भडका झाला. यामुळे आग लागली.
हॉटेल बंद असल्याने आग समजू शकली नाही. मात्र, हॉटेलच्या खिडकीमधून धूर बाहेर असल्याचे निदर्शनास आल्याने जवळ जाऊन पाहिले असता आगीने रौद्ररुप धारण केले होते.
हॉटेल मालक दिनकर कोते यांना समजताच त्यांनी याठिकाणी धाव घेत तातडीने नगरपंचायत व साईसंस्थानच्या अग्निशामक विभागास आग लागल्याचे कळविले.
लागलीच नगरपंचायत व त्यापाठोपाठ साईसंस्थानचा अग्निशामक बंब दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आणता आली.
आगीत पहिल्या मजल्यावरील फर्निचर, सिलिंग, काउंटर, टेबल, कॉट, गादी, दरवाजे, खिडक्या आदींसह सुमारे सात लाखांचे नुकसान झाले.
सुदैवाने ही आग वेळीच आटोक्यात आली; अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. लॉकडाऊन असल्याने येथील हॉटेल व्यावसायाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®