अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या संक्रमणामध्ये घट होताना दिसत आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यानी राज्यात मिशन बिगेन ५ अंतर्गत अनेक सुविधांना सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
या नियमांची अमंलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार राज्यात हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट्स, बार सुरू झाले आहेत.

शासनाच्या SOP प्रमाणे या आस्थापना खुल्या करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील हॉटेल, फुड कोर्ट,
रेस्टॉरंट्स, बार सकाळी ९ ते रात्री १० यावेळेत खुले ठेवता येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिले आहेत
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved