नगर-पुणे रस्त्यावर ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने पतीचा मृत्यू ,पत्नी गंभीर

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  नगर-पुणे रस्त्यावर सुपे (ता. पारनेर) शिवारात सुपे औद्योगिक वसाहत चौकात बुधवारी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.

मच्छिंद्र कोंडिबा वाबळे व त्यांची पत्नी कल्पना (घाणेगाव, ता. पारनेर) हे दुचाकीवरून (एमएच १६, बीई ४०९५) नगरच्या दिशेने जात असताना

सुपे औद्योगिक वसाहत चौकात एचपी पेट्रोल पंपासमोर पीकअपची (एमएच १६ एबी ४२४७) मोटारसायकलीला जोरदार धडक बसली.

त्यामुळे पती-पत्नी रस्त्यावर पडले. त्याचवेळी जवळून ट्रक (एमपी ०८ एमएच २२०८) चालला होता. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.

नगरमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. मच्छिंद्र यांचे उपचारांदरम्यान निधन झाले. पिकअप , ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment