अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : दुसर्या जिल्ह्यातून गावांमध्ये येणाऱ्या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण न करणे आता नगर तालुक्यात गावच्या सरपंचाला चांगलेच महागात पडणार आहे.
अशा सरपंचांवर थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांनी ही माहिती दिली.
सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा रेड झोनमधून गावाकडे येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागांमध्ये करोना जाऊन पोहोचला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आता ग्रामीण स्तरावर राबविण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
त्यासाठी गावपातळीवर ग्रामस्तरीय सुरक्षा समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
नगर तालुक्यात निंबळक, जखणगाव, भोयरेपठार या गावांच्या सरपंचांनी त्यांना दिलेल्या करोना व्यवस्थापनाच्या जबाबदारीमध्ये हलगर्जीपणा व दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे त्यांना प्रशासनाने, ‘तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये ,’ अशी नोटीस बजावली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews