बाळ बोठेच्या बंगल्यात मिळाले महत्त्वाचे पुरावे !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महीला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याच्या बंगल्यात पोलिसांना हत्याकांडाबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.

पोलिसांनी शनिवारी (दि.१२) बोठे याच्या नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील जिद्ध या बंगल्याची घेतली. जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी हत्या झाल्यानंतर पोलीस तपासात अवघ्या दोन दिवसांत बोठे हाच या हत्याकांडाचा सुत्रधार असल्याचे समोर आले. गेल्या दहा दिवसांत पोलिसांनी बोठे याच्या घराची तीन वेळा झडती घेतली आहे.

शनिवारी पोलिसांनी बारकाईने बोठे याचा बंगला तपासला. यात महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. तसेच सात दिवसांपूर्वी त्याचा साथीदार सागर भिंगारदिवे याच्या घराचीही झडती घेतली होती.

यावेळी काही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत. हत्याकांडात नाव निष्पन्न झाल्यानंतर बोठे नगर शहरातून पसार झाला. पोलीस गेल्या दहा दिवसांपासून त्याचा शोध घेत आहेत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment