अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर या कार्यालयामार्फत दिनांक 11 ते 16 जुन, 020 या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी जिल्हयातील सर्व उद्योजकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्या कामाच्या गरजेनुसार तात्काळ मनुष्यबळाची आवश्यकता आहे अशा उद्योजकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे.
जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवार ज्यांनी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आपली नांवनोंदणी केलेली नसेल अशा उमेदवारांना आवाहन करण्यात येते की,
आपली नावनोंदणी करुन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता वि. जा. मुकणे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews