नादुरुस्त रस्ता बनतोय मृत्यूस कारणीभूत; नागरिकांनी दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री चौफुला ते म्हसे रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असून, रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना फार मोठी कसरत करावी लागत आहे.

या रस्त्याची लवकरात दुरुस्ती करावी अन्यथा आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कुकडी सह. साखर कारखान्याचे मा. संचालक संभाजी देवीकर म्हसे, पिंप्री कोलंदर, वडगाव शिंदोडी, येळपणे आदी गावांतील ग्रामस्थांनी दिला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री चौफुला ते म्हसे रस्त्याची सध्या अतिशय दयनिय अवस्था झाली असून, रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना अनेक शारीरिक वेदना सहन कराव्या लागत आहेत. तसेच या ठिकाणी छोटे मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत.

याकडे संबंधित विभाागचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. सध्या अनेक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू असल्याने ऊसवाहतुकीमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.

यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालवणे मुश्किल झाले असून, साधे पायी चालता येत नाही. संबंधित विभागाने लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कुकडी सह.

साखर कारखान्याचे मा. संचालक संभाजी देवीकर म्हसे, पिंप्री कोलंदर, वडगाव शिंदोडी, येळपणे आदी गावांतील ग्रामस्थांनी दिला आहे.