अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- कोरोनामुळे संकटात असलेल्या बळीराजासमोर आणखी एक संकट समोर आले आहे,  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वैधशाळेच्या अहवामान अंदाजनुसार पुणे आणि नगर जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात नगर जिल्ह्यात विविध भागात वादळी पाऊस झालेला असून त्यात शेतकर्‍यांच्या गहू, कांदा पिकांसह फळबागाचे मोठे नुकसान झाले होते.

त्यात कोरोनाचा कहर वाढल्याने महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे आणि फळबागाचे पंचनामे केलेले नाहीत. आता पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment