अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-संगमनेर शहरात कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी ग्रामीण भागात वाढली आहे. गुरुवारी तालुक्यात ३४ बाधित आढळले असून पैकी फक्त पाच शहरातील आहे.
तर १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बाधितांची संख्या ४४४० झाली असून ४१६८ रुग्ण यातून बरे झाले आहे. २३१ बाधितांवर उपचार सुरु असून ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी शहरातील पंचायत समिती (२), नवीन अकोले रोड, पावबाकी रोड, घास बाजार (१) तर तालुक्यातील जोर्वे (१३), गुंजाळवाडी (३), अंभोरे, आश्वी बुद्रुक, चंदनापुरी (२), उंबरी, वडगावपान,
समनापुर, पिंप्रीलौकी, निमज, खळी (१) आदी भागात ३४ बाधित मिळून आले. प्रशासनाचे सर्व पातळीवर प्रयत्न सुरु असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved