अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाने चांगली वैद्यकीय सेवा देऊन नावलौकिक मिळवला आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवून द्यावे, असे आदेश महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी दिले.
रुग्णालयातील कामकाजाचा व अडचणींचा आढावा महापाैर वाकळे यांनी घेतला. रुग्णालयाच्या बळकटीकरणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित बैठकीला आयुक्त श्रीकांत मायकलवार उपस्थित होते.
महापौर वाकळे म्हणाले, डॉक्टर, नर्स व कर्मचारी चांगले काम करत आहेत. कमी मनुष्यबळात रुग्णसेवा सुरू आहे. एचआयव्ही,
कावीळचे रुग्ण प्रसुतीसाठी येत असतात. त्यासाठी लवकरच दुसरे ऑपरेशन थिएटर सुरू करण्यासाठी मदत करू, असेही महापाैर वाकळे यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved