झारखंड :- लग्नात आलेल्या 12 तरुणांनी 9 वीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी घडली आहे.
दरम्यान ह्या घटनेनतंर विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलगी कौरैया बाजडीह ह्या शेजारील गावातील रहिवासी होती. ग्रामस्थांनी घटनेची माहिती होताच त्यांनी दोन अल्पवयीनांसह 5 आरोपींना पकडून त्यांना चांगलाच चोप दिला.
शनिवारी सकाळी उर्वरित पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. यातील मुख्य आरोपी पीडिताच्या शेजारच्याचा नातेवाईक आहे.
घटनेनंतर तो फरार झाला. पोलिसांना इतर आरोपींनी अटक केली असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.
होपना सोरेन (25), सागर मुर्मू (19), बालेश्वर सोरेन (18) यांसह 15 आणि 16 वर्षीय दोन अल्पवयीनांना अटक करण्यात आली आहे.
या आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून या घटनेत कोलेश्वर मुर्मू, मुकेश हेम्ब्रम, सुरेश मुर्मू, मिथुन सोरेन, छोटू किस्कू, बाबूधन सोरेन तसेच राजन यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले.
पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार युवकांवर मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्याचा आरोप केला आहे.
जामताडा चारेडीह येथील रहिवासी छोटूची पीडितेसोबत पूर्वीपासून ओळख होती. लग्नासाठी वरातीत आल्यानंतर छोटू शुक्रवारी सायंकाळी पीडितेच्या गावात पोहोचला.
तो पीडितेला आपल्यासोबत पायी जंगलात घेऊन गेला होता. रात्री दहाच्या सुमारास पीडिता ग्रामस्थांना बेशुद्ध अवस्थेत मिळाली होती.